अलिबागमधील उद्योगधंदे पहिले तर फार प्राचीन काळापासून भरभराटीस आलेले. मीठ निर्मिती व कुटीर उद्योग हे येथील प्राचीन व्यवसाय. चौल, महाड, गोरेगाव, राजपुरी बंदरामधून बराच माल परदेशी निर्यात होत असे. छत्रपती शिवाजी महारांनी जहाज बांधणीचा व्यवसाय सुरु केला, कान्होजी आंग्रेंनी तो नंतर पुढे चालविला. मुघल व पोर्तुगीझ काळापासून रेशमी व सुटी कापडाचा व्यवसाय चालत आलेला नंतर तो हळूहळू कमी झाला. १८४० च्या एका उल्लेखानुसार रेवदंडा येथे पितांबर विणणारे कुशल कारागीर होते.
नंतर १८९७ मध्ये भातगिरणी सुरु झाली स्वातंत्र्यपूर्व काळात औद्योगिकरण तसे संथ गतीने चालू होते स्वातंत्र्यानंतर मात्र त्यास चालना मिळाली. मागील शतकापासून पनवेल बैलगाडीची चाके बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. नजीकच्या कर्नाळा जंगलातील टणक सागापासून चाके बनवितात. येथील चाकजोडांना रायगड, सातारा, अहमदनगर, पुणे , कोल्हापूर येथून मागणी असते.
अशाप्रकारचे अनेक उद्योग येथे चालू आहेत, त्यापैकी काही उद्योगांचा घेतलेला हा आढावा