Sign In

कोळंबी कोळीवाडा

कोळंबी कोळीवाडा

अलिबागच्या समुद्रामध्ये विविध प्रकारची कोळंबी सापडते, गोड्या पाण्यापेक्षा समुद्रातील कोळंबीची चव वेगळी असते. समुद्रामध्ये साधारणतः लाल कोळंबी दिसून येते. कोळंबी हे सर्वाना परिचित असल्यामुळे येथे कोळंबीचे विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यातीलच हा एक पदार्थ म्हणजे “कोळंबी कोळीवाडा”. सुकी व चुरचुरीत कोळंबी कोळीवाडा ताज्या सॅलड सोबत फारच चवदार लागतो. नवीन जेवणाच्या स्टाईल मध्ये स्टार्टर म्हणून उत्तम 🙂

साहित्य – ताज्या मोठ्या आकाराच्या पूर्ण सोललेल्या कोळंब्या (२५० ग्राम), चिंच (२ चमचे), लसूण (८ ते १० बारीक ठेचलेल्या पाकळ्या), कोथिंबीर (चवीने), हळद (पाव चमचा), अलिबागचा घरगुती मसाला (१ ते २ चमचे), तांदळाचे पीठ (अर्धी वाटी), बारीक रवा (१ चमचा),

कृती – प्रथम एका ताटात धुतलेली कोळंबी घेऊन त्यात हळद, मीठ, चिंचेचा कोळ, अलिबागचा घरगुती मसाला, कोथिंबीर, हे सर्व एकत्र करून साधारणतः १५ ते २० मिनिटे ठेवावे. ह्यामुळे कोळंबी छान मॅरिनेट होते. एका बाजूला तांदुळाच्या पीठामध्ये, रवा, थोडे मीठ थोडा मसाला, एकत्र करावे. नंतर एक तवा घेऊन त्यामध्ये थोडे तेल घालावे, व गॅस मंद आचेवर ठेवावा. तेल तापले कि मॅरीनेट केलेल्या कोलंब्या एक एक करून पीठामध्ये घालून नंतर तव्यामध्ये सोडाव्यात. तेलामध्ये ह्या कोलंब्या व्यवस्थित तळून काढाव्यात. नंतर सर्विंग प्लेट मध्ये व्यवस्थित ठेऊन त्याच्या बाजूला सॅलड ची सजावट करून सर्व्ह कराव्यात.

  • 94
  • Sea-Food Recipes
  • Comments Off on कोळंबी कोळीवाडा

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password