फणसाड अभयारण्य हे रायगड जिल्ह्यातील वन्यजीव अभयारण्य असून हे रोहा व मुरुड तालुक्यामध्ये पसरलेले आहे. जवळपास साडेबारा हजार एकर च्या परिसरात हे अभयारण्य वसलेले आहे . हे अभयारण्य साधारणतः १९८५ च्या सुमारास समुद्र किनारपट्टीच्या जवळ निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्दिष्टाने अस्तित्वात आले. हे अभयारण्य मुरुड जंजिरा येथील सिद्दी नवाब यांचे एकेकाळी खाजगी शिकारीचे मैदान होते. नवाबांनी जंगलात रस्ते आणि पाणवठे बांधले.
जैव विविधता –
येथे आढळणारी जैव विविधता ही येथे विविध निसर्गप्रेमी, छायाचित्रकार, पक्षीनिरीक्षक यांना आकर्षित करतात. येथील पक्ष्यांच्या १६० पेक्षा जास्त प्रजाती, वन्य प्राण्यांच्या १७, सापांच्या २७, फुलपाखरे ८०-९० तसेच झाडांच्या ७०० पेक्षा जास्त प्रजाती यांच्यामुळे हे अभयारण्य एक वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण ठरले आहे.
फणसाड धरण –
याच अभयारण्यात फणसाड चे धरण आहे. पावसाळ्यात हे धरण पूर्ण भरून बंधाऱ्यावरून वाहू लागते व याचा आनंद घ्यायला बरेच पर्यटक येथे येत असतात. जवळच असलेल्या दोन नद्यांच्या मधोमध असलेले हे मातीचे धरण आहे . यामधून जवळच्या गावांना पाणी पुरवठा होतो
कसे पोहचाल ?
अलिबागपासून मुरुड ला जायच्या रस्त्यावरच बोर्ली मांडला हे गाव सोडले कि डावीकडे फणसाड अभयारण्यात जाण्यासाठी रस्ता आहे. अलिबागपासून साधारणतः २५-२७ किमी अंतरावर हे अभयारण्य आहे.
- मुंबई ते अलिबाग – १०० किमी.
- पुणे ते अलिबाग – १५० किमी.
- मुरुड पासून अंतर – २५ किमी.
- अलिबाग पासून अंतर – २५ किमी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे
जवळचे आकर्षण –
- मुरुड जंजिरा
- काशीद बीच
- कोर्लई किल्ला
- विक्रम विनायक मंदिर