अलिबाग पासून साधारण ३२ किमी अंतरावर अलिबाग-मुरुड रस्त्यावर “काशीद” गाव आहे. हे गाव दोन डोंगराच्या मधोमध आहे. इथला सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे काशिद पुणे मुंबई कडील पर्यटकांमध्ये अधिक प्रसिद्ध आहे. मिनी गोवा म्हणून ही या ठिकाणाची ओळख आहे. ३ किमी लांब पसलेला काशिद बीच, किनाऱ्यावरील उंच नारळाची झाडे तसेच सुरुंची बेटे आणि दूरवर पसरलेली पांढरी रुपेरी वाळू त्यामुळे या किनाऱ्याचे सौदर्य खुलून आले आहे.
पर्यटन –
इथे पर्यटकांची गर्दी असते. मुंबई पुण्या पासून जवळ असल्यामुळे एक दिवसाच्या सहली साठी काशिद जास्त प्रसिद्ध आहे. इथून जवळच मुरुड हे गाव आहे तिथला जंजिरा किल्ला पाहण्या साठी येणारे पर्यटक देखील रस्त्यात थांबून काशिद बीच वर वेळ घालवणे पसंत करतात. इथे समुद्र किनाऱ्या वर वॉटर गेम उपलब्ध आहेत. तसेच खाद्य पदार्थ देखील उपलबद्ध आहेत. समुद्र किनाऱ्यावर निवांत वेळ घालवून संध्याकाळी सुर्यास्ताचा अनुभव इथून घेता येतो. एक दिवसाची भटकंती करून सुर्यास्ताचा अनुभव घेऊन मुंबई पुण्याला परत जाता येऊ शकते. इथे मुक्काम करण्या साठी रिसॉर्ट, हॉटेल्स उपलब्ध आहेत तसेच घरगुती सोयी ही आहेत. मांसाहारी, शाकाहारी जेवण ही मिळते. पावसाळ्यात, समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट्स आणि फूड स्टॉल उपलब्ध नसतात.
काशीद समुद्रकिनाऱ्याच्या उजव्या बाजूला एका मोठ्या जेट्टी चे बांधकाम सुरु आहे. भविष्यात कदाचित अलिबाग, मुंबईहून सागरी वाहतूक लवकरच सुरु होऊ शकते.
जवळचे आकर्षण –
कसे पोहोचाल –
- अलिबागपासून अंतर – ३२ कि. मी.
- मुंबई ते अलिबाग – १०० कि. मी.
- पुणे ते अलिबाग – १४५ कि. मी.
- मुरुड पासून अंतर – १८ कि. मी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे