श्री काशी विश्वेश्वर हेअलिबागमधील आंग्रेकालीन मंदिरांपैकी एक मंदिर. शहराच्या मधोमध असलेले काशी विश्वेश्वर मंदिर हे अलिबागकारांचे मोठे श्रद्धास्थान आहे.
इतिहास –
भारतामध्ये काशी हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. काशी विश्वेश्वर हे शंकराचे रूप म्हणून ओळखले जाते. अलिबागपासून काशी हे स्थान हे फार दूर असल्याने सर्वांना तेथे जाणे शक्य नसते, यामुळे त्यावेळी येथील सरदारांनी काशी विश्वेश्वराची स्थापना केली.
आंग्रेंच्या कारकिर्दीमध्ये या परिसरामध्ये बऱ्याच मंदिरांची स्थापना व जीर्णोद्धार झाले, त्यातील हे एक. पूर्वीच्या काळामध्ये हे मंदिर दगडी असावे व नंतर हे मंदिर नव्याने बांधण्यात आले. या परिसरामध्ये काही जुने दगड सापडतात. पूर्वी ह्या मंदिरासमोर एक पुष्करिणी होती असे म्हटले जाते. मंदिरामध्ये प्रशस्त जागा असून मधोमध खोलगट जागेमध्ये शिवपिंडी आहे. मंदिरावरील छप्पर कौलारू आहे.
उत्सव –
श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी येथे अभिषेक व महा पूजा केली जाते तसेच भजन कीर्तन सुद्धा आयोजित केले जातात. महाशिवरात्रीला सुद्धा येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
जवळचे आकर्षण –
Amenities
- Bike Parking
- Car Parking
- Friendly workspace
- Good for Kids