आंग्रेकालीन अष्टागारातील एक महत्वपूर्ण गाव. आणि या गावाची ओळख बनलेला हा ‘आक्षीचा स्तंभ’. स्तंभाकडून मुख्य रस्त्यापासून आत गेले कि आक्षी गाव लागते. अलिबाग रेवदंडा मुख्य रस्त्यावरच आक्षी येथे हा स्तंभ आढळतो.
अलिबाग तालुक्याचे दक्षिण आणि उत्तर भाग जोडले जाण्यास महत्वपूर्ण असा हा आक्षीचा पूल म्हणजेच साखरखडीचा पूल. आणि या पुलाचा साक्षीदार आणि आठवण म्हणून हा स्तंभ. स्तंभावर कोरलेला मजकूर खालीलप्रमाणे आहे –
“सन १९२८ साली आक्षी येथील श्री डॉ विनायक कृष्णा डोंगरे व श्री दिनकर कृष्णा डोंगरे यांनी २ १/२ टक्के व्याजाने रुपये ५०००० रक्कम देऊ केल्याने या कामास चालना मिळाली. योजना तयार करण्याचे कामी बोर्डाचे माजी अध्यक्ष श्री. सिताराम विश्वनाथ टिळक व मुंबईचे सॉलिसिटर मे. सालोमन मोझेस वाकरूळकर यांची व रस्त्याचे कामावर देखरेख करण्याचे कामी श्री. गणेश चिंतामणी दांडेकर रा. रेवदंडा यांची व तसेच मे. खान बहामून मुहंमद इनुस अध्यक्ष ता. लॉ बोर्ड अलिबाग यांची बहुमोल मदत झाली.
डॉ. डोंगरे हे बोर्डाचे अध्यक्ष असल्यामुळे ह्या योजनेचा अखेर पर्यंत पुरस्कार करणे सुलभ झाले. योजनेची कोनशिला कर्मवीर श्रीमंत सरदार चंद्रोजीराव संभाजीराव आंग्रे मु. ग्वाल्हेर यांचे हस्ते ता २५ जानेवारी १९३१ रोजी बसविली व योजना संपूर्ण झाल्याचा समारंभ तारीख २७ फेब्रुवारी १९३२ रोजी श्री जगद्गुरू श्री शंकराचार्य (डॉ कुर्तकोटी ) यांचे हस्ते झाला. “
स्तंभावर सर्व देणगीदारांची नावे लिहिली आहेत. स्तंभ त्रिकोणी आकाराचा असून पूर्णपणे दगडी आहे व तीन बाजूला संगमरवरावर मजकूर लिहिला आहे.
जवळचे आकर्षण –
- आक्षी समुद्र किनारा (१ कि. मी.)
- नागाव समुद्र किनारा (३ कि. मी.)
- ऐतिहासिक शिलालेख (१०० मी)
- रेवदंडा किल्ला व समुद्रकिनारा (१० कि. मी.)
- रामेश्वर मंदिर (८ कि. मी.)
कसे पोहोचाल –
- अलिबागपासून अंतर – ७ कि. मी.
- मुंबई ते अलिबाग – १०० कि. मी.
- पुणे ते अलिबाग – १४५ कि. मी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे