Sign In

पहिला मराठी शिलालेख

पहिला मराठी शिलालेख

आक्षी हे अलिबागपासून दक्षिणेला सुमारे पाच किमी वर वसलेले आणि नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेले खेडे. आलिबाग मुरुड रस्त्यावरून जाताना आक्षी हे गाव दिसते. आक्षी गावाला फार मोठा एतिहासिक वारसा लाभला आहे. गावाच्या प्रवेश द्वाराजवळ असलेल्या प्राचीन स्तंभामुळे हे गाव ऐतिहासिक असल्याची खात्री पटते.  या परिसरात कोकण शिलाहारवंशीय नृपती केशिदेवराय यांचा व देवगिरी यादव नृपती रामचंद्रदेवः यांचा असे दोन शिलालेख सापडले आहेत.  

शिलालेख १ –  केशीदेवराय यांचा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून तो शके ९३४. प्राधावी संवत्सर, अधिक मास (ज्येष्ठ), शुक्रवार, १६ मे इ स १०१२ या तिथीचा आहे. या शिलालेखात केशीदेवराय -कोकण शिलाहार नृपती, भइर्जु सेणुई-महाप्रधान व लुनया-लेख कोरणारा या व्यक्तिनामांचा समावेश आहे. या शिलालेखामध्ये सर्वात वरच्या भागात चंद्र व सूर्य कोरलेले आहेत.नंतर संस्कृत व मराठी अशा मिश्र स्वरूपातील एकूण ९ ओळीं आपल्याला पाहायला मिळतात. लेखाचा सारांश – कोकणचा राजा चक्रवर्ती केशीदेवराय याचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने गावातील नऊ कवली धान्य देवीसाठी दान दिले हे नमूद करण्याचा आहे. या लेखाचा शेवट शापात्मक वचनांनी झाला आहे. मराठी भाषेतील उपलब्ध लेखातील हा पहिला शिलालेख आहे असे पुरातत्वज्ञांचे मत आहे.

शिलालेख २ – यादव नृपती रामचंद्रदेव यांचा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र भाषेतील असून देवनागरी लिपीतील आहे. तो शके १२१३ (गत वर्ष), खर संवत्सर, चैत्र शुद्ध ७, शुक्रवार, ९ मार्च इस १२९१ या तिथीचा आहे, या लेखात यादव नृपती, जाईदेव-यादव नृपतीचा मांडलिक आणि ईश्वरदेव क्षत्रिय-जाईदेवाचा दान देणारा पुत्र या व्यक्तिनामांचा समावेश आहे. लेखाचा सारांश – यादव नृपती रामचंद्रदेव यांचा मांडलिक जाईदेव याचा पुत्र ईश्वरदेव क्षत्रिय याने उपरोक्त तिथीला देवीला गद्द्याण दान दिले हे नमूद करणे आहे. या दोन्ही शिलालेखांवर चंद्र व सूर्याच्या प्रतिमा आहेत.  

हे शिलालेख म्हणजे एक गध्देगळ आहे.  गध्देगळ हा पूर्वीच्या राजामहाराजांनी परिसरातील लोकांना सदरच्या जमिनीच्या संदर्भात घालुन दिलेल्या नियम व अटी तंतोतंत पालन कराव्यात यासाठी दिलेला धमकीवजा ईशारा असे. बर्याचदा देवस्थानांची अथवा दान बक्षीस दिलेल्या स्थावर संपत्तीचे रक्षण व्हावे व कोणीही गैरवापर करू नये म्हणून ही शापवाणी दगडावर कोरली जात असे. त्यावर सूर्य चंद्र म्हणजे सूर्य चंद्र असे पर्यंत हे शाश्वत राहील.

या शिलालेखाच्या शोधात अनेक इतिहास प्रेमी आक्षी गावात येत असतात. परंतु ह्या शिलालेखांचे जास्त चांगल्या पद्धतीने जतन करणे जरुरी आहे.

  • 351
  • Historical
  • Comments Off on पहिला मराठी शिलालेख

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password