Sign In

कोकम सरबत

कोकम सरबत

बहुतांशी करून कोकणातच सापडणारे कोकम हे फळ सरबतासाठी मात्र सगळीकडे प्रसिद्ध आहे उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी कोकम सरबत हमखास वापरले जाते. कोकणात, तसेच अलिबागमध्ये सुद्धा कोकमाची झाडे मुबलक प्रमाणात दिसून येतात. हिरवेगार भरगच्च पण उंच असे झाड एप्रिल, मे मध्ये गर्द लाल रंगाच्या कोकमांनी भरून जाते.

अलिबाग आणि परिसरात कोकम सरबताची सोय घरीच केली जाते. कोकमाची सालीचे तुकडे करून एका काचेच्या बरणीत ठेवले जातात, त्यात साखर टाकली जाते व किंचितसे मीठ. ह्या बरणीचे तोंड पातळ कापडाने बंद केले जाते व हि बरणी उन्हात ठेवली जाते, उन्हाने हि साखर वितळते व कोकमाच्या सालांचा रस व अर्क त्यात उतरतो. अशा प्रकारे घट्ट असा कोकमाचा रस तयार. होतो, साधारणतः १ महिना हि बरणी रोज उन्हात ठेवली जाते, नंतर घरामध्ये ठेवली जाते. गरजेप्रमाणे त्यातील रस काढून सरबत बनवले जाते.
आजकाल बरेचसे लघुउद्योग कोकम सरबत बनवून विकतात.

कोकमाचे बरेच औषधी गुणधर्मे आहेत. मुख्य उपयोग म्हणजे हे पित्तनाशक आहे . तसेच जेवण पचण्यासाठी सुद्धा मोठा उपयोग होतो. शरीरातील ऍसिडिटी कमी करते.

  • 154
  • Eat Any Time
  • Comments Off on कोकम सरबत

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password