Sign In

गणपती कारखाना

गणपती कारखाना

Marathi अलिबाग मधील छोट्या छोट्या गावातही अनेक मूर्ती कलाकार आहेत. गणपती बनवण्याचा पारंपारिक व्यवसाय इथल्या अनेक गावात चालू आहे. शाडूच्या मातीची सुबक गणेश मूर्ती, वापरलेले सुंदर रंग आणि रेखाटलेले सुबक डोळे यामुळे या मुर्त्या आकर्षक दिसतात. महाराष्ट्र तसेच देशातील काना कोपऱ्यातून व परदेशातूनही या मूर्तींना विशेष मागणी आहे. अलिबाग मधील गावातून एका पिढी कडून दुसऱ्या पिढीला या मूर्ती बनवण्याच्या कलेचे प्रशिक्षण मिळाले आहे. अनेक कलाकारांचे, कामगारांचे  उपजीविकेचे साधन हा व्यवसाय आहे. वर्षभर गणपती बनविण्याचा कारखाना चालू असतो. कलाकार वर्षभर मूर्ती बनवतात व गणपती उत्सवाच्या २ महिने आधी मूर्तीना रंग लावण्याचे व सजवण्याचे काम चालू होते. फार पूर्वी पासून काही घराणी या व्यवसायात गुंतलेली आहेत. गावातल्या अनेक लोकांना या गणपती कारखान्यात काम मिळते. वर्षानुवर्ष चालू असलेला हा व्यवसाय स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. वाढत्या मागणी मुळे चांगला आर्थिक फायदा देखील या व्यवसायात होतो.

पेणचे गणपती –

अलिबाग जवळील पेण या गावातील गणपती मूर्ती जगप्रसिद्ध आहेत. गणपती उत्सवात पेण येथील गणपती मूर्तीना देशातून तसेच परदेशातूनही मोठी मागणी आहे. पेण मधील गणपती तयार करण्याचा व्यवसाय सुमारे १२५ वर्ष जुना आहे. भिकाजी कृष्ण देवधरांनी हा व्यवसाय सुरु केल्याचे म्हंटले जाते. पेण प्रमाणेच अलिबाग येथे देखील गणपती तयार करण्याचे कारखाने आहेत. पूर्वी पेण येथील डोंगरात सापडणारी पांढरी चिकण माती मूर्ती बनवण्यासाठी वापरली जात असे. त्यानंतर पोरबंदर हून शाडूची माती व जर्मनी वरून रंग येऊ लागले. ब्रिटीश साचे बनवणाऱ्या एका कारखान्यातून सोनार जातीचा एक मनुष्य साचे बनवण्याची कला शिकून आला व त्यानंतर मूर्ती बनवण्या साठी साच्यांचा उपयोग होऊ लागला. १९५३ मध्ये प्लास्टरच्या साच्यां एवजी रबरी साचे अस्थित्वात आले व स्थानिक कलाकारांनी ही साचे बनवण्याची कला शिकून घेतली. मूर्ती बनविणे त्या मूर्तीला रंगकाम करणे या कामात पेण मधील कलाकार तरबेज झाले. त्याच बरोबर ही कला पेणच्या आसपासच्या गावातही पोहोचली.

आजचा व्यवसाय – 

अलीकडे मात्र हा व्यवसाय नव्याने सुरु करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. वंश परंपरेने चालू असलेल्या त्या व्यवसायला मोठे स्वरूप देण्याचे प्रमाण म्हणावे तसे वाढले नाही. पारंपारिक उद्योगा पेक्षा उच्च शिक्षण घेऊन पुणे, मुंबई, बेंगलोर या सारख्या मोठ्या शहरात लठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरूण वर्गाचा कल जास्त दिसून येत आहे. तसेच पूर, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसाना मुळे अनेक कारखाने बंद पडले आहेत. ही पारंपारिक कला व या पूर्वापार चालत आलेल्या व्यवसायाचे संवर्धन करणे, त्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अलिबाग मधील स्थानिक लोक व मूळ अलिबाग मधील रहिवासी असलेले पण सध्या नोकरी व्यवसाया निमित्त मोठ्या शहरात किंवा परदेशात स्थायिक झालेल्या लोकांनी या व्यवसायात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देऊन व्यवसाया साठी कर्ज उपलब्ध करून देऊन या व्यवसायाला जागतिक स्थरावर मोठे स्वरूप देणे शक्य होऊ शकेल. या व्यवसायात तरूण वर्ग अधिक प्रमाणात उतरला तर अलिबाग मधील स्थानिक लोकांना भविष्यात रोजगार उपलब्ध करून देणारा हा अत्यंत महत्वाचा व्यवसाय ठरू शकेल.

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password