नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन
नारळी पौर्णिमेचे महत्व अलिबाग आणि परिसरातील कोळी बांधवांना जास्त असते. साधारणतः जून आणि जुलै च्या महिन्यामध्ये समुद्र खवळलेला असल्याने समुद्रातील मासेमारी बंद असते. नारळी पौर्णिमेच्या नंतर समुद्र थोडा शांत होतो व या दिवसापासून मासेमारीला पुन्हा सुरुवात होते. मरळीपोर्णिमेच्या दिवशी कोळी समाज समुद्राची यथासांग पूजा करतात व सागराला नारळ अर्पण करून ...
गोकुळाष्टमी
अलिबाग मधील लोक इतर कोकण वासियां प्रमाणे उत्सव प्रिय व धार्मिक आहेत. इतर सण उत्सवा प्रमाणे गावातल्या मंदिरात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. भजने रंगतात, कृष्ण जन्म कथा सांगितली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जातो. पाळणा, पारंपारिक गवळणी, गाणी गायली जातात आणि जन्माष्टमीचा प्रसाद सर्वाना ...
गणेशोत्सव
कोकणातील प्रत्येकाला गणपती उत्सव म्हणजे अतिशय प्रिय. कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही असो गौरी गणपती च्या सणाला गावी परतून येतो. पोटा साठी आपल्या मूळ गावापासून दूर असणारी माणसे आपल्या गावी आपल्या माणसात परत येतात. आणि गावातल्या घराला घरपण येते. सण उत्सव म्हणजे नियमित दिनक्रमातून मिळालेला ब्रेक. कधीतरी होणारा हा बदल ...
आग्रावची शिडाच्या होड्यांची शर्यत
अलिबागपासून साधारणतः २० किमी अंतरावर असलेले आग्राव हे गाव. आणि इथली खासियत म्हणजे येथील खाडीतील अनोखी अशी शिडाच्या होड्यांची शर्यत. गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हि शर्यत भरवली जाते. रेवदंडा आणि आग्राव च्या मध्ये जी खाडी आहे त्यामध्ये हि शर्यत होते. आग्राव येथे मोठ्या प्रमाणात असलेला कोळी समाज आणि त्यांची श्रद्धा ...