About Alisa Noory
कोकण आणि अलिबाग म्हटले कि डोळ्यासमोर येतात ते विविध खाद्यपदार्थ. अलिबाग ला निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक वरदानामुळे येथे विविध पालेभाज्या, फळभाज्या, फळे, मासे, फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तसेच निरनिराळ्या उत्सव, सणांना विविध प्रकारचे खाद्य पदार्थ येथे आवडीने बनवले जातात. यातील काही पदार्थ फार पूर्वीपासून बनवले जातात त्यामुळे त्यांना पारंपरिक महत्व प्राप्त झाले आहे व त्यासाठी व त्यांच्या चवीसाठी ते फार प्रसिद्ध आहेत.
Visit Websiteउकडिचे मोदक
कोकणातील उकडीचे मोदक म्हणजे खवैयांसाठी स्वर्ग. गणपती बाप्पाचा हा आवडता नैवेद्य. त्या निमित्ताने दर संकष्टीला व गणेशोत्सवात कोकणात घराघरात हमखास बनवण्यात येणारा गोड पदार्थ. मोदक दिसायला जितका सुबक तितकाच चविष्ट. पूर्णपणे उकडलेला असल्याने पचायला सोपा तसाच बनवायला तितकाच कठीण. मोदक बनवणे कि सुद्धा एक खास कला. कोकणात जवळ जवळ सगळ्याच ...
सोलकढी
कोकणातील सुप्रसिद्ध सोलकढी !!! आंबट गोड, लालभडक कोकम पहिले कि तोंडाला पाणी सुटते. अश्याच ताज्या कोकमाची सोलकढी म्हणजे निखळ स्वाद. आरोग्यपूर्ण, चवदार, आकर्षक गुलाबी रंगाची सोलकढी, त्यावर कोथिंबीर पेरलेली – अशी हि कोकणातली सोलकढी हल्ली खूपच प्रसिद्ध झाली आहे. शाकाहारी असो व मांसाहारी, एकदा भरपेट जेवले कि १-२ वाट्या सोलकढी ...
पुरण पोळी
गरमागरम मऊ पुरणपोळी हे अजून एक कोकणातील वैशिष्ट्य. पुरणपोळी हि साधारणतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये बनवितात. पण प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या. तशीच अलिबागची पद्धत वेगळी. होळी च्या सणासाठी येथे घराघरात पुरणपोळी बनते. “होळी रे होळी, पुरणाची पोळी” हे येथील प्रसिद्ध वाक्य आहे. तसेच गणपतीउत्सवामध्ये व अनेक सणांना पुरणपोळी बनतात. अलिबाग परिसरात पुरणपोळी ...
पोपटी
पोपटी हे एक कोकणातले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थाचा प्रकार आहे. निसर्गसमृद्ध कोकणातील काही खाद्यपदार्थ आणि त्यांच्या बनविण्याच्या खास वैशिट्यपूर्ण पद्धती या त्या पदार्थाची चव द्विगुणित करतात आणि त्या पदार्थाला एक प्रकारच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. यापैकीच एक वैशिट्यपूर्ण पदार्थ म्हणजे पोपटी. फार जुना तरीही अजून तीच चटपटीत चव. पोपटी लावणे हे एक ...
नारळाच्या दुधातील शेवया
अलिबागचे वैशिष्ट्य असलेल्या नारळ आणि तांदूळ यापासून बनविण्यात येणारा हा अजून एक गोड पदार्थ. साधारणतः नारळी पौर्णिमा किंवा दहीहंडी या उत्सवांच्या दिवशी हा पदार्थ घरोघरी बनवला जातो. नारळ आणि तांदूळ हे फार पूर्वीपासून येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळेच फार पूर्वीपासून हा पदार्थ येथे बनवण्यात येतो. पांढऱ्याशुभ्र तांदुळाचे पीठ व ...
आमरस
जगातील सर्व रस एका बाजूला आणि आमरस एका बाजूला !!! अस्सल कोकणातील पिवळ्याशार रसरशीत हापूस आंब्याचा आमरस. कोकणातला हा अस्सल हिरा. याला जगात तोड नाही. जेवणासोबत पुरीबरोबर ताव मारा किंवा वाटीत घेऊन नुसताच खा. जेवणाआधी खा किंवा जेवणानंतर स्वीट डिश म्हणून खा, आजकाल ice-cream सोबत सुद्धा झकास डिश बनवल्या जातात. ...