Sign In

आफ्रिकन बाओबाब – गोरखचिंच

आफ्रिकन बाओबाब – गोरखचिंच

गोरखचिंच हा महाराष्ट्रातील एक दुर्मिळ वृक्ष, चौल येथील भोवाळे येथे डोंगरावरील श्री दत्तमंदिराकडे जाण्याच्या मार्गावर दिसून येतो. मूळचा आफ्रिका खंडात, मादागास्कर, तसेच ऑस्ट्रेलिया येथे सापडणारा हा वृक्ष भारतात साधारणतः २५० ते ३०० वर्षांपूर्वी आला असावा असा अंदाज. गोरख चिंचेला महाराष्ट्रामध्ये चोरचिंच, तर इतर देशांमध्ये मंकी ब्रेडट्री असे देखील म्हणतात. याची उंची साधारणतः ५० फूट तर खोडाचा परीघ १०० फुटापर्यंत असू शकतो. या वृक्षाचे आयुष्य १००० वर्षांपर्यंत असू शकते. चौल येथील हा वृक्ष जुना असला तरी याचे वयोमान फार नसावे असा अंदाज येतो.

या वृक्षाची फुले ५ पाकळ्यांची असून लांब देठ असते, व हि फुले रात्री फुलतात. यांचा मंद सुवास परिसरात दरवळतो. फुले गळून गेल्यावर याला बाटलीच्या आकाराची साधारणतः १ फूट लांबीची फळे येतात. गोरखचिंचेच्या फळातील गराची चव फिकट मधुर आणि किंचित कडू असते. गोरखचिंचेच्या पानांत ‘क’ जीवनसत्त्व, शर्करा, पोटॅशिअम व टार्टरेट असते. याच्या फळामध्ये सुद्धा अनेकविध औषधी गुणधर्म आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये इतर सरबतांपेक्षा गोरखचिंचेचे सरबत शीतल आणि दाहनाशक असते. या वृक्षाचे लाकूड मऊ पण टिकाऊ असल्यामुळे याचा उपयोग सुद्धा बऱ्याच ठिकाणी केला जातो.

अजून एक असेच गोरख चिंचेचे झाड वरसोली येथे राममंदिराच्या मागे आढळते.

असे हे बहुगुणधर्मी, आकाराने अवाढव्य व दुर्मिळ गोरखचिंचेचे झाड चौल मध्ये गेलात तर नक्की पहा.

  • 444
  • Natural Wonders
  • Comments Off on आफ्रिकन बाओबाब – गोरखचिंच

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password