Sign In

आग्रावची शिडाच्या होड्यांची शर्यत

आग्रावची शिडाच्या होड्यांची शर्यत

अलिबागपासून साधारणतः २० किमी अंतरावर असलेले आग्राव हे गाव. आणि इथली खासियत म्हणजे येथील खाडीतील अनोखी अशी शिडाच्या होड्यांची शर्यत. गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हि शर्यत भरवली जाते. रेवदंडा आणि आग्राव च्या मध्ये जी खाडी आहे त्यामध्ये हि शर्यत होते. आग्राव येथे मोठ्या प्रमाणात असलेला कोळी समाज आणि त्यांची श्रद्धा असलेली एकवीरा देवी. या देवीच्या मानाची पालखी सुद्धा या दिवशी होडीतून नेली जाते. आणि पाठोपाठ शर्यतीला सुरुवात होते. हि शर्यत पाहायला फार दूरवरून लोक येतात. साधारणतः ३५ ते ४० वर्षांपासून हि शर्यत येथे भरविली जाते.

या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील कोळी बांधव त्यांच्या शिडाच्या होड्या पाण्यात उतरवितात. या होड्यांची नावे सुद्धा साजेशी असतात. एकवीरा देवीची पालखी निघाली कि नंतर शर्यतीला सुरुवात होते ती एका मोठ्या आवाजाच्या फटाक्याने. नंतर सर्व होड्यांचे शीड उघडले जाते व शर्यतीला सुरुवात होते. या शर्यतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या होड्यांना इंजिन नसते व या पूर्णपणे वाऱ्यावर चालतात. यामध्ये महत्वाचा असतो वारा, वाऱ्याचा वेग आणि शिडाची त्या वाऱ्यासोबत करण्यात येणारे नियोजन – यावरच त्या होडीचे शर्यतीतील भवितव्य असते. यामध्ये महत्वाची भूमिका असते ती म्हणजे या होडीचे तांडेल आणि खलाशी यांची. या सर्वांचे कसब त्या जोडीला जिंकून देते. ठराविक अंतर पार केल्यानंतर या होड्या उलट दिशेनं परत फिरतात. या वळणावर सर्वांचे खरे कसब पणाला लागते, वाऱ्याचा अंदाज घेत होडी उलट दिशेनं फिरवणे आणि त्याचबरोबर होडीतील पाणी बाहेर काढणे हे जिकिरीचे काम असते. या शर्यतीदरम्यान कधी कधी होडी उलटण्याची सुद्धा संभव असतो तर कधी कधी होडी वाचविण्यासाठी खलाशी स्वतःहून पाण्यात उड्या मारतात . अशी हि मजेशीर शर्यत पाहायला अगदी मुंबई पुण्याहून लोक येतात.

अशी हि अलिबाग आणि आग्राव ची शान असलेली शिडाच्या होड्यांची शर्यत पाहायला नक्की या

  • 141
  • Festivals
  • Comments Off on आग्रावची शिडाच्या होड्यांची शर्यत

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password