चौलमधील प्रसिद्ध व पुरातन अशा सात देव्यांपैकी एक देवी. चौल नाक्यापासून साधारणतः २ किलोमीटर अंतरावर हे पुरातन मंदिर आजही फार प्रसिद्ध आहे. देवीचे स्थान जागृत समजले आहे असे समजले जाते. मंदिराचा जीर्णोद्धार १७५९ मध्ये झाला. आंग्रे घराण्याची ह्या देवीवर फार श्रद्धा होती.
पूर्वी येथे आंग्रेकालीन लाकडी व कौलारू मंदिर होते, १९९० च्या सुमारास हे मंदिर सिमेंट कॉंक्रिट ने बांधले गेले. मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून दक्षिण व उत्तर बाजूसही प्रत्येकी एक प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वार व सभामंडपावर एक एक कळस आहे. देवीची मूर्ती गाभाऱ्यात मूळ ठिकाणीच आहे. मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. व एक पुरातन पुष्करिणी सुद्धा आहे, यातील पाण्याचा वापर सध्या येथील गावकरी करतात.
या देवीवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविकांची श्रद्धा आहे. खूप दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी व नवस बोलण्यासाठी येतात. नवरात्रीला येथे देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या बाहेर तीन देवींचे जुने अर्धाकृती मुर्त्या आहेत. खोकलु देवी, खरजु देवी, गुलमा देवी. खोकला, खरुज अंगावर गुलम येतात तेव्हा या देविंची उपासना केली जाते
जवळचे आकर्षण –
कसे पोहोचाल –
- अलिबागपासून अंतर – १८ कि. मी.
- मुंबई ते अलिबाग – १०० कि. मी.
- पुणे ते अलिबाग – १४५ कि. मी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे
Amenities
- Bike Parking
- Friendly workspace
- Good for Kids