Sign In

देवमासा सांगाडा

देवमासा सांगाडा

रेवदंडा किनाऱ्याजवळ १८ जुने २००३ च्या मध्यरात्री एका प्रचंड महाकाय माश्याचे मृत शरीर किनाऱ्यास लागले. या महाकाय माशाच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्व परिसरात पसरू लागली व म्हणून बुलडोझर च्या साहाय्याने समुद्रावरच वाळूमध्ये खड्डा खणून त्याला पुरण्यात आले. साधारण ८-१० महिन्यानंतर त्याचे सर्व मांस झडून गेल्यावर हाडांचा सांगाडा हळूहळू वाळूच्या पृष्ठभागावर दिसू लागला. समुद्राच्या पाण्याच्या लाटांमुळे त्याची हाडे सुद्धा इतस्त्तः पसरू लागली. त्यामुळे रेवदंडा ग्राम पंचायत, तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने विखुरलेली हाडे गोळा केली तसेच वाळूच्या थराखाली पुरली गेलेली हाडे शोधून काढली व एकत्र आणली गेली. या कामामध्ये या भागातील जाणकार व्यक्ती व वृक्षमित्र कै राजाभाऊ राईलकर व श्री चंद्रशेखर पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. पुढे अनेक महिने अथक परिश्रम करून व काही रासायनिक प्रक्रिया करून या सांगाड्याचे जतन केले गेले.

हा देवमासा अंदाजे ८ त ९ महिन्यांचे पिल्लू होते. ह्याची लांबी सुमारे ५० फूट व उंची साडेसात फूट आणि वजन अंदाजे २३ टन होते. तरीही संग्रहित केलेल्या देवमाश्यांमध्ये आकारमानानुसार संबंध भारतात याचा दुसरा क्रमांक लागतो. बडोदा येथील संग्रहालयात ठेवलेला सांगाडा सगळ्यात मोठा असून त्याची लांबी ६५ फूट आहे.

  • 338
  • Natural Wonders
  • Comments Off on देवमासा सांगाडा

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password