Sign In

रामदास बोट दुर्घटना

रामदास बोट दुर्घटना

मुंबई ते रेवस जलवाहतूक फार पूर्वीपासून चालू आहे. आजसारख्या वेगानं चालणाऱ्या रो रो सारख्या सेवा तेव्हा नव्हत्या, पण रामदास सारखी महाकाय बोट होती, ती सुद्धा परदेशी बनावटीची. अलिबाग आणि कोकणातील बरेच लोक कामधंद्यासाठी मुंबईला जात. त्यामध्ये काही नित्यनेमाने व्यापारासाठी जाणारे लोक असत. तर काही आपल्या नातेवाईकांकडे जाणारे असत.

दि १७ जुलै १९४७. दीप अमावास्येच्या निमित्ताने बहुतेक मुंबईला सुट्टी. पावसाचे दिवस होते. बरेच लोक मुंबईहून अलिबाग आणि कोकणाकडे यायला निघालेले . नियमितप्रमाणे रामदास हि महाकाय बोट मुंबई च्या भाऊंच्या धक्क्यावरून रेवस ला यायला सकाळी ९ वाजता निघाली. सकाळपासून बारीक पाऊस चालू होता. हि बोट एवढी महाकाय होती कि या बोटीला काही अघटित घडेल याची पुसटशी कल्पनासुद्धा प्रवाश्यांना नव्हती. बोटीने भाऊचा धक्का सोडला. साधारणतः ८ ते ९ मैलांवर आल्यावर अचानक हवामान बदलले. बोटीवर हाहाकार उडाला आणि काही कळायच्या आत बोट कलंडली. काहींना लाईफ जॅकेट मिळाले, त्यातील काही लोक पोहू लागले. बाकी सर्वांना घेऊन बोटीने तळ गाठला. रेवस कडून काही मच्छीमार बोटी घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले. त्यांना अचानक भर समुद्रामध्ये बरीच माणसे पोहताना आढळली तर काही प्रेते तरंगत होती. त्यांना जमले तेवढी माणसे त्यांनी बोटीवर घेतली, व त्यांचा प्राण वाचला. दुपारचे २ ते ३ वाजले तरी हि बातमी किनाऱ्यावर आली नव्हती, पण तोपर्यंत साधारणतः पावणे आठशे लोकांना जलसमाधी मिळाली होती .

यातील बहुतांश लोक कोकणवासी होते. अलिबागसह पूर्ण कोकण दुःखसागरात बुडाला. जलवाहतुकीसंदर्भातील एवढी मोठी आणि भीषण दुर्घटना भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच घडली होती. या दुर्घटनेचे पडसाद पुढील अनेक महिने दिसून आले. या घटनेला आज ७७ वर्षे झाली तरीही येथील काही वृद्ध माणसांना हि घटना अजून आठवते. रामदास दुर्घटनेच्या साधारणतः वीस वर्षांपूर्वी अजून दोन बोट जयंती आणि तुकाराम यांना सुद्धा जलसमाधी मिळाली होती.

आज सर्वांना टायटॅनिक माहिती आहे पण आपल्या जवळची, अलिबाग आणि मुंबई च्या समुद्राने गिळंकृत केलेली महाकाय रामदास बोटीची दुर्घटना फार कमी जणांना माहिती आहे.

  • 415
  • Historical
  • Comments Off on रामदास बोट दुर्घटना

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password