Sign In

पद्म दुर्ग - Hosted By

2
Add Review Viewed - 256

मुरुड गावातील समुद्रात जंजीऱ्या पासून जवळच “पद्मदुर्ग” हा किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. “जंजिरा” किल्ल्यात असलेल्या सिद्दीचा उपद्रव कोकण किनारपट्टीवर वाढत चालला होता. त्याच्या आरमारी सामर्थ्याने आजूबाजूच्या प्रदेशात दरारा निर्माण केला होता. राजापुर, मुरुड येथील कोळी समाजावर तसेच इतर समाजावर सिद्दी चा अत्याचार वाढत चालला होता. त्याला पायबंद घालता यावी

सिद्दीच्या समुद्रातील हालचालींवर नियंत्रण आणण्या साठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुरूडच्या समुद्रात असलेल्या कासा या कासवाच्या आकाराच्या बेटावर “पद्मदुर्ग” हा किल्ला बांधला. सिद्दीशी सामना करत रात्र दिवस एक करीत मराठी मावळ्यांनी या किल्ल्याची उभारणी केली.

किल्ल्याचा इतिहास :

इ.स. १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन महाराजांनी जंजी-याची मोहीम काढली या मोहिमेत मचव्यावरून तोफांचा मारा जंजी-या वर केला पण अपेक्षित परिणाम साधला नाही.  मग मोरोपंत यांनी जंजी-याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली. पद्मदुर्गावर काम करणाऱ्या अष्टागारातील सोन कोळ्याच्या प्रमुखाने लाय पाटलाने हे जबरदस्त आव्हान स्वीकारले.  एका रात्री लाय पाटील आपल्या ८-१० सहका-यांसह पद्मदुर्ग मधून बाहेर पडले.  अंधाराचा फायदा घेत जंजि-याच्या मागील बाजूस पद्म दुर्गा वरून येऊन तटाला दोरखंडाच्या शिड्या लावण्याचे धाडस केले होते पण मोरोपंतांची व पाटलांची वेळ जुळली नाही व प्रयत्न फसला; पण त्यांनी दाखविलेले धाडस पाहून शिवाजी महाराजांनी लाय पाटील याना पालखीचा मान दिला;

पण दर्यात फिरणाऱ्या कोळ्यांना पालखीचा काय उपयोग, असे म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराजांच्या काय ते लक्षात आले. त्यांनी मोरोपंतांना, एक नवे गलबत बांधून त्याचे नाव ‘पालखी’ असे ठेवून लाय पाटलांच्या ते स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्या किनारी सरपाटीलकी दिली.

संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पद्मदुर्ग स्वराज्यात होता.  संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही १६८० मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे.  त्यानंतर पद्मदुर्ग सिद्धीच्या ताब्यात गेला.  मराठयांनी पेशवे काळात परत तो जिंकून घेतला.

किल्ल्याची माहिती :

“पद्मदुर्ग” किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्या समोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आला आहे, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले असावे.

या किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ट्य येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे चुना भरून बांधकाम केले आहे. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष पाहून मुख्य किल्ल्याकडे जाता येते. पद्मदुर्गाच्या महाद्वारामधे प्रवेश करण्यासाठी चार-पाच पायऱ्या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. चारही बाजूंनी खारे पाणी असताना आतमधे गोड्या पाण्यासाठी चार टाकी केलेली दिसतात. या किल्ल्याच्या तटबंदीवरून जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो.

किल्ल्यावर कसे पोहोचायचे :

पद्मदुर्गावर जाण्यासाठी मुरुड गावातून राजापुरीला जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर खाडीलगत एकदरा गाव आहे तिथल्या किनाऱ्यावरून किल्ल्यावर जाता येते. कोळी लोक बोटीने समुद्राचा व हवामानाचा अंदाज पाहून किल्ल्यात घेऊन जातात. किल्ला नौदलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी त्यांची परवानगी लागते.

  • अलिबाग मुरूड अंतर : ५० किमी,
  •  पुणे-मुरुड अंतर १५० किमी, (ताम्हिणी मार्गे )
  •  मुंबई-मुरुड अंतर १५० किमी

जवळचे आकर्षण –

Tags

Location / Contacts :

Weather in City :

Explore More Forts

Similar Listings

Claim listing: पद्म दुर्ग

Reply to Message

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password