हमामखाना म्हणजे राजमहालातील शाही स्नानगृह. बाहेरून पाहताना सहा कमानी (ओवऱ्या ) दिसतात, एका कमानीतून आत आतमध्ये एक मोठ्या साधारणतः ६ ते ७ मी चौकोनी दालनात जात येते. या दालनावरील साधारणतः १० मी उंचीवरचा गोल घुमट पडझड झालेल्या अवस्थेत आहे. याच दालनाच्या मध्यभागी पूर्वी अष्टकोनी कारंजे असावे. दालनाच्या उत्तर दक्षिण व पूर्व बाजूंच्या भिंतीत कमानीयुक्त बैठकीची सोया आहे. दालनाच्या वायव्य कोपऱ्यातील वळणाच्या अरुंद वाटेने आत गेल्यावर उत्तर बाजूस दोन स्नानगृहे आहेत. स्नानगृहाच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर जुन्या आसा मशिदीचे काही अवशेष आढळतात.
चौल नाक्यावरून शितलादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने काही अंतर गेल्यावर हमामखान्याकडे जाण्यासाठी वळण्यापूर्वी रस्त्यालगत डाव्या बाजूस मुस्लमानकाळीं हजमखान्याची कशीबशी उभी असलेली अर्धवट भिंत दिसते. कबरस्तान, आसा मशीद, हमामखाना, हजमखाना इत्यादी अवशेषांवरून या परिसरात मुसलमानी राजवटीतील काही कार्यालये असावीत असा अंदाज येतो.
संदर्भ – रायगड गॅझेटिअर
जवळचे आकर्षण –
कसे पोहोचाल –
- अलिबागपासून अंतर – १८ कि. मी.
- मुंबई ते अलिबाग – १०० कि. मी.
- पुणे ते अलिबाग – १४५ कि. मी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे