मुरुड जंजिरा किल्ल्यासमोर जमिनीवर राजपुरीच्या पूर्वेस असलेल्या खारशेत या ओसाड गावाजवळ खोकरी नावाचे खेडे होते. येथे इंडो-सारसेनिक पद्धतीची मोठ्या दगडातील दर्ग्यासारखी वास्तू आहे. तिच्यात सिद्दी सिरुरचे थडगे आहे. याशिवाय तेथे याकूतखान (नवाब १६७०-७७ व नंतर मुघल आरमार प्रमुख १६७७-९१ आणि नंतर पुन्हा जंजिरा नवाब १६९६-१७०७ ) याचे आणि त्याचा भाऊ खैरीयतखान (दंडा -राजपुरीचा प्रशासक १६७०-७७ व नंतर जंजिरा प्रशासक १६७७-९६ ) याचेही मोठे दगडातील थडगे आहे. याकूतखानाचे थडग्यावर अरेबिक लिपीत मृत्यू – जुम्मा दिलावल तिसरा दिवस हिजरी सन १११८ (इसवीसन १७०७)असा कोरीव लेख आहे. तिसऱ्या थडग्यावर मृत्यू हिजरी सन ११०८ (१६९६)असा उल्लेख आहे.
येथील मुख्य वास्तुव्यतिरिक्त परिसरात बरेच छोटीमोठी थडगी दिसून येतात.काही गावांच्या महसुलातून काही रक्कम या मकबऱ्याच्या देखरेखीसाठी खर्च केली जात असे. थडग्यातील खिडक्यांना जाळीदार नक्षीकाम आहे.
जवळची आकर्षणे’ –
कसे पोहोचाल –
- मुरुडपासून अंतर – ७ कि. मी.
- मुंबई ते मुरुड – १५० कि. मी.
- पुणे ते मुरुड – १५० कि. मी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे