Sign In

आमरस

आमरस

जगातील सर्व रस एका बाजूला आणि आमरस एका बाजूला !!!

अस्सल कोकणातील पिवळ्याशार रसरशीत हापूस आंब्याचा आमरस. कोकणातला हा अस्सल हिरा. याला जगात तोड नाही. जेवणासोबत पुरीबरोबर ताव मारा किंवा वाटीत घेऊन नुसताच खा. जेवणाआधी खा किंवा जेवणानंतर स्वीट डिश म्हणून खा, आजकाल ice-cream सोबत सुद्धा झकास डिश बनवल्या जातात. पुणेकरांकडे तर आंब्याची चव असलेली सुप्रसिद्ध मस्तानी मिळते. आमरस बनवावा आणि खावा तर अस्सल हापूस आंब्यांपासून बनवलेलाच. आमरस आणि हापूस आंबा हे पक्के गणित. बाकीच्या आंब्यांना हापूसची सर नाही.

आंब्याच्या तयार पाटीमधून निवडक रसाळ आंबे घ्यावे. (पाटी म्हणजे आंब्याची लाकडी पेटी) काही वेळ पाण्यात भिजवून ठेवावेत. नंतर त्या आंब्यांचा रस काढावा. आजकाल मिक्सर च्या साहाय्याने हा रस बारीक व चांगल्या प्रकारे मिक्स केला जातो. या रसामध्ये थोडीशी चवीप्रमाणे साखर घावली व वेलची पूड घालावी. थोडा वेळ फ्रीझ मध्ये ठेवला कि थंडगार आमरस खायला खूपच मजा येते. एक गोष्ट मात्र नक्की करावी – ती म्हणजे आमरस करताना थोडासा जास्तच करावा कारण आमरस खाताना पोट भरते पण मन कधीच नाही भरत. इथे मनाचे आणि पोटाचे गणित मात्र नक्की चुकते.

आमरसाचा पुढचा भाग म्हणजे आंबापोळी, पाककृती थोडी वेगळी आहे परंतु मजा काही औरच.

असा हा कोकणातील आमरस, याचा आस्वाद घ्यावा तो म्हणजे आंब्यांच्या सिझन मधेच, या अलिबागला उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि खा पोटभर आमरस.

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password