Sign In

जांभ

जांभ

साधारणतः अलिबाग आणि कोकण परिसरात सापडणारे हे गोड फळ. हिरवट पांढऱ्या रंगाचे, तर कधी फिकट गुलाबी रंगाचे, आतून रसाळ व करकरीत असे हे फळ चवीला अतिशय स्वादिष्ट व गोड असते काही वर्षांपूर्वी हिरवट पांढरे जांभ बऱ्याच प्रमाणात दिसत, त्याच्या सोबत लाल रंगाचे लाँग आकाराचे जांभ सुद्धा थोड्या प्रमाणात दिसत. पण गेली काही वर्षे पांढऱ्या जांभाच्याच आकाराचे फिकट गुलाबी जांभ सुद्धा दिसू लागलेत.

साधारणतः उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये झाडांवर हे जांभाचे घड दिसू लागतात. मग एक दोन जांभ पडून खाण्याचा मोह आवरता येत नाही. अलिबाग परिसरात जो कोकणचा मेवा मिळतो त्यामध्ये करवंदे, रांजण, ताडगोळे, जांभळे, आंबे, यामध्ये जांभ हमखास दिसणार. बाजारात बाकी फळांसोबत जांभ सुद्धा विक्रीस येतात. जांभाची फुले सुद्धा आकर्षक असतात. झाडाच्या पानांना हुबेहूब जाम्भसारखा वास येतो. जांभ हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.

  • 132
  • Fruits
  • Comments Off on जांभ

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password