Sign In

फणस

फणस

कोकण म्हटले कि नजरेसमोर जी निवडक फळे येतात त्यापैकी एक म्हणजे फणस. अलिबाग आणि परिसरात सुद्धा फणसाची झाडे बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. बाहेरून जितका काटेरी तितकाच आतून मधुर. नारळी पोफळीच्या बागांमध्ये एकतरी फणसाचे झाड नक्की सापडते. साधारणतः हिवाळा ते पावसाळ्याची सुरुवात असा फणसाचा बहर जास्त असतो.

फणसाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे बरका आणि कापा. बरका फणसाचे गरे हे फार मऊ असतात, त्यामुळे अशा गऱ्यांचे बहुधा करून फणसपोळी, वडी असे जास्त काळ टिकणारे पदार्थ बनवले जातात. कापा फणसाचे गरे खाण्यासाठी वापरतात. कच्या फणसाची भाजी सुद्धा फार चवदार लागते. कोकणातला अजून एक चवदार खाद्यपदार्थ म्हणजे फणसाचे उंबर. फणसाचे सुकवलेले गरे, फणसपोळी, इत्यादी जास्त काळ टिकणारे पदार्थ येथील बाजारात विकायला येतात, व अशा पदार्थांना येथे येणाऱ्या पर्यटकांकडून बरीच मागणी असते.

फणसाच्या झाडाचे लाकूड हे फार कठीण असते, ह्या लाकडाचे थोडे सुशोभीकरण व काही प्रक्रिया करून हे शोभेसाठी सुद्धा वापरले जाते.

शास्त्रीय नाव – Artocarpus heterophyllus

प्रचलित नाव – Jackfruit , फणस

हंगाम – हिवाळा ते पावसाळ्याची सुरुवात

  • 125
  • Fruits
  • Comments Off on फणस

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password