Alibag is full of natural wonders. There are many unique and rare attractions which will definitely amaze you.
धातूचा खडक
तुम्ही कधी एका दगडावर दुसऱ्या दगडाने मारल्यावर धातूसारखा आवाज ऐकलाय ? नाही ना! असा एक मोठाला दगड खांदेरी किल्ल्यामध्ये सापडतो. किल्ल्याजवळील जेट्टीच्या उजवीकडून समोरच्या बाजूला आल्या नंतर तिथे एक आश्चर्यकारक खडक दिसतो. या खडकावर दुसर्या दगडाने प्रहार केला असता तो खडक धातूच्या भांड्यासारखा आवाज निर्माण करतो. पण याच्याच बाजूच्या दगडावर ...
किहीमच्या समुद्रातील शिवपिंडी
किहीमचा समुद्रकिनारा खडकाळ आहे, ह्या किनाऱ्याजवळ श्रावण महिन्यात एक चमत्कारिक घटना पाहायला मिळते. श्रावण महिन्यामध्ये समुद्रात किनाऱ्याजवळ एक शंकराची पिंडी दिसते, बाकी वर्षभर हि पिंडी दिसत नाही. ह्या घटनेमागे समुद्रातील काही विशिष्ट हालचाली कारणीभूत असतात, श्रावण महिन्यामध्ये येथील वाळू बऱ्याच प्रमाणात वाहून जाते व ह्या पिंडीचे दर्शन होते, नंतर परत ...
फांद्यांचे ताडाचे झाड
निसर्ग आपल्या सभोवताली ज्या गोष्टी निर्माण करतो त्यावर त्याचेच अधिपत्य असते. आणि निसर्गाचे सुद्धा काही नियम असतात ज्या नियमांमध्ये अखंड सृष्टी चालत असते. परंतु कधी कधी या निसर्गनियमांना सुद्धा अपवाद असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशातलेच एक झाड म्हणजे नारळाचे किंवा तत्सम जातीचे, अशा प्रकारच्या झाडाची रचना म्हणजे लांब सडक खोड ...
देवमासा सांगाडा
रेवदंडा किनाऱ्याजवळ १८ जुने २००३ च्या मध्यरात्री एका प्रचंड महाकाय माश्याचे मृत शरीर किनाऱ्यास लागले. या महाकाय माशाच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्व परिसरात पसरू लागली व म्हणून बुलडोझर च्या साहाय्याने समुद्रावरच वाळूमध्ये खड्डा खणून त्याला पुरण्यात आले. साधारण ८-१० महिन्यानंतर त्याचे सर्व मांस झडून गेल्यावर हाडांचा सांगाडा हळूहळू वाळूच्या पृष्ठभागावर ...
आफ्रिकन बाओबाब – गोरखचिंच
गोरखचिंच हा महाराष्ट्रातील एक दुर्मिळ वृक्ष, चौल येथील भोवाळे येथे डोंगरावरील श्री दत्तमंदिराकडे जाण्याच्या मार्गावर दिसून येतो. मूळचा आफ्रिका खंडात, मादागास्कर, तसेच ऑस्ट्रेलिया येथे सापडणारा हा वृक्ष भारतात साधारणतः २५० ते ३०० वर्षांपूर्वी आला असावा असा अंदाज. गोरख चिंचेला महाराष्ट्रामध्ये चोरचिंच, तर इतर देशांमध्ये मंकी ब्रेडट्री असे देखील म्हणतात. याची ...