Alibag is also famous for it’s large variety of seasonal fruits. Weather and soil here produces very unique taste of various fruits. Hence at different season, we can see different fruits available here.
कलिंगड
Watermelon is the fruit that will quench your thirst in the summers. Hence, it is known as summer cooler. Its cooling agents provide relaxation and respite from the burning sun. It is a large fruit with a sweet watery red pulp inside the hard rind. It is very popular among all ...
जांभ
साधारणतः अलिबाग आणि कोकण परिसरात सापडणारे हे गोड फळ. हिरवट पांढऱ्या रंगाचे, तर कधी फिकट गुलाबी रंगाचे, आतून रसाळ व करकरीत असे हे फळ चवीला अतिशय स्वादिष्ट व गोड असते काही वर्षांपूर्वी हिरवट पांढरे जांभ बऱ्याच प्रमाणात दिसत, त्याच्या सोबत लाल रंगाचे लाँग आकाराचे जांभ सुद्धा थोड्या प्रमाणात दिसत. पण ...
पपनीस
अलिबाग परिसरात सापडणारे हे एक आंबट गोड चव असलेले फळ.मोसंबी व संत्र यासारख्या तत्सम प्रजातीतील पण कदाचित सर्वात मोठ्या आकाराचे हे फळ. आकार साधारणतः मोसंबी च्या चार पटीने मोठा. दिसायला अगदी मोसंबी सारखा, पण आतून फिका लाल. मोठ्या रसदार पाकळ्या असलेले. चवीला आंबट गोड. पावसाळ्यामध्ये पपनीस जास्त प्रमाणात आढळून येतात, ...
आंबा
हापूस आंबा – फळांचा राजा, अलिबाग आणि परिसरातील आंब्याची असंख्य झाडे पाहावयास मिळतात, तश्याच विविध प्रकारच्या प्रजाती आणि चवी सुद्धा आढळतात. मूळ कोकणा समान वातावरण व पोषक जमीन यामुळे अस्सल कोकणातील चव येथील खास करून हापूस आंब्याला आलेली आहे. बऱ्याच शेतांमध्ये आजकाल भातशेतीमध्ये आंब्यांची लागवड केलेली दिसून येते. साधारणतः हिवाळ्याच्या ...
कोकम
बहुतांशी करून कोकणातच सापडणारे हे फळ कोकम सरबतासाठी मात्र सगळीकडे प्रसिद्ध आहे उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी कोकम सरबत हमखास वापरले जाते. कोकणात, तसेच अलिबागमध्ये सुद्धा कोकमाची झाडे मुबलक प्रमाणात दिसून येतात. हिरवेगार भरगच्च पण उंच असे झाड एप्रिल, मे मध्ये गर्द लाल रंगाच्या कोकमांनी भरून जाते. कोकमाचा उपयोग सरबतासोबतच जेवणातही बऱ्याच ...
फणस
कोकण म्हटले कि नजरेसमोर जी निवडक फळे येतात त्यापैकी एक म्हणजे फणस. अलिबाग आणि परिसरात सुद्धा फणसाची झाडे बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. बाहेरून जितका काटेरी तितकाच आतून मधुर. नारळी पोफळीच्या बागांमध्ये एकतरी फणसाचे झाड नक्की सापडते. साधारणतः हिवाळा ते पावसाळ्याची सुरुवात असा फणसाचा बहर जास्त असतो. फणसाचे दोन मुख्य प्रकार ...
नारळ
अलिबाग कोकण म्हटले कि समोर दिसतात नारळी पोफळीच्या हिरव्यागार बागा. कोकणची शान म्हणजे ह्या बागा. सरळ उंच वाढत जाणारे व वरच्या बाजूला शानदार हिरवागार डोलारा. व त्या डोलाऱ्यातून लगडलेली नारळाची पेंड. बारा महिने झाडाला बहर आलेला. कोकणातील प्रत्येक जेवणात न चुकता वापर होणारा. प्रत्येक धार्मिक कार्यात वापरले जाणारे श्रीफळ. नारळाच्या ...
करवंद
करवंद किंवा डोंगरची मैना. काळेभोर छोट्याश्या आकाराचे व आतून लालभडक असलेले गोड फळ म्हणजे कोकणचा मेवा. उन्हाळ्याच्या दिवसात डोंगराळ भागात हमखास करवंदाची जाळी दिसतात, त्यावर हिरव्या रंगाची कच्ची तर काळ्या रंगाची पिकलेली करवंदे पाहायला व तोडायला काही भलताच आनंद. काटेरी हिरवेगार असलेले हे घनदाट झुडूप डोंगराळ भागात जास्त करून आढळते, ...