अलिबागमधील आल्हाददायक वातावरण समुद्रकिनारा व मुबलक पाऊस. यामुळे येथे विविध ऋतूंमध्ये विविध पिके घेतली जातात. अगदी पावसाच्या सुरुवातीपासून ते मे महिन्यापर्यंत येथील शेतांमध्ये शेतकरी सतत कसले ना कसले पीक घेत असतात. अन्नधान्य, कडधान्य, विविध प्रकारच्या भाज्या,फळे, फुले, पांढरा कांदा, नारळ, सुपारी, अशी एक ना अनेक पिके येथे वर्षभर घेतली जातात.
पांढरा कांदा
पांढरा शुभ्र, चवीला गोड, व औषधी गुण असलेला अलिबागचा जगप्रसिद्ध पांढरा कांदा !!! अलिबागच्या बऱ्याचश्या वैशिष्ट्यांपैकी एक. अलिबागच्या कांद्याची चव दुसऱ्या कुठल्याही कांद्याला नाही. पांढरा शुभ्र, चकाकी असलेला कांदा व त्याची पिळदार वेणी हि अलिबागच्या कांद्याची ओळख. या कांद्याचे औषधी गुणधर्म सुद्धा सर्वपरिचित आहेत. हि ओळख आता जगभर पोहोचलीय. अलीकडेच ...
कलिंगड
Watermelon is the fruit that will quench your thirst in the summers. Hence, it is known as summer cooler. Its cooling agents provide relaxation and respite from the burning sun. It is a large fruit with a sweet watery red pulp inside the hard rind. It is very popular among all ...
वाल
कोकणातील कडवे वाल, अर्थात बिरडे. कडधान्यातील सर्वांचा आवडता प्रकार. वालाचे विविध खाद्यपदार्थ कोकणात फार प्रसिद्ध आहेत. राज्यामध्ये सर्वात जास्त वालाचे पीक हे रायगड जिल्यामध्ये घेतले जाते. अलिबाग व परिसरात मोठ्या प्रमाणात वालाचे पीक घेतले जाते. हे रब्बी पीक असून भाताचे पीक काढल्यानंतर जमीन दोन तीन वेळा नांगरून पेरणी करतात. दसरा ...
भात शेती
कोकणातील हवामान, जमीन आणि भरपूर पडणारा पाऊस भाताच्या पिकाला पूरक आहे. अलिबाग मधील शेतकरी भात शेती प्रामुख्याने करताना आढळतो. खार व निमखार जमिनीत भाताचे पिक घेता येते. कोलम, रत्ना, जया, सुवर्णा, इंद्रायणी, अश्या अनेक जातींचा तांदूळ इथे पिकवला जातो. भात लावणी :- भाताची शेती करताना १२ ते १५ सेमी खोल ...
पावसाळी पालेभाज्या
अलिबाग आणि परिसरामध्ये जेव्हा जून महिन्यामध्ये पाऊस पडतो तेव्हा आजूबाजूच्या डोंगरावर व जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती उगवतात, यातील बऱ्याच प्रकारच्या वनस्पती म्हणजेच या पावसाळी पालेभाज्या. या पालेभाज्या फक्त २ ते ३ आठवडे उपलब्ध असतात. बऱ्याच भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. साधारणतः पाऊस सुरु झाला कि बऱ्याच वेळा आपली तब्येत थोडीफार कमीजास्त ...
आंबा
हापूस आंबा – फळांचा राजा, अलिबाग आणि परिसरातील आंब्याची असंख्य झाडे पाहावयास मिळतात, तश्याच विविध प्रकारच्या प्रजाती आणि चवी सुद्धा आढळतात. मूळ कोकणा समान वातावरण व पोषक जमीन यामुळे अस्सल कोकणातील चव येथील खास करून हापूस आंब्याला आलेली आहे. बऱ्याच शेतांमध्ये आजकाल भातशेतीमध्ये आंब्यांची लागवड केलेली दिसून येते. साधारणतः हिवाळ्याच्या ...
नारळ
अलिबाग कोकण म्हटले कि समोर दिसतात नारळी पोफळीच्या हिरव्यागार बागा. कोकणची शान म्हणजे ह्या बागा. सरळ उंच वाढत जाणारे व वरच्या बाजूला शानदार हिरवागार डोलारा. व त्या डोलाऱ्यातून लगडलेली नारळाची पेंड. बारा महिने झाडाला बहर आलेला. कोकणातील प्रत्येक जेवणात न चुकता वापर होणारा. प्रत्येक धार्मिक कार्यात वापरले जाणारे श्रीफळ. नारळाच्या ...
सुपारी
अलिबाग कोकण म्हटले कि समोर दिसतात नारळी पोफळीच्या हिरव्यागार बागा. कोकणची शान म्हणजे ह्या बागा , वाड्या. पोफळी म्हणजेच सुपारीचे झाड. सरळ उंच साधारणतः ३० ते ४० फुटापर्यंत लांब आणि वर हिरवागार डोलारा, त्या हिरव्यागार डोलाऱ्यातून डोकावणाऱ्या पिवळ्याशार सुपारीचे घड. कोकणात प्रतेय्क घराच्या आजूबाजूला तसेच मागील वाडीमध्ये हमखास दिसणारे हे ...